देवळीत न.प. कर्मचार्‍यांचा लेखणी बंद आंदोलनाचा इशारा

* नगराध्यक्षांचा जाच असल्याचा केला आरोप

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
देवळी, 
municipal-council-employees-pen-strike : देवळी नगर परिषदेमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे त्यातच भर म्हणून अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या जाचाला कंटाळून नगरपरिषद कर्मचार्‍यांनी गुरुवार १२ रोजी मुख्याधिकार्‍यांना पत्र लिहून लेखणी बंद करीत असल्याचे निवेदन दिले.
 

kml 
 
 
 
निवेदनात नमुद केल्यानुसार, नगराध्यक्ष कर्मचार्‍यांना तळमजल्यावर असलेल्या त्यांच्या दालनात बोलवून तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर अपमानास्पद वागणूक देतात. परिणामी, आज शुक्रवार १३ रोजी अध्यक्ष किरण ठाकरे यांनी नगर परिषदेत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी कर्मचार्‍यांनी दिलेल्या लेखणी बंद आंदोलनाचे इशार्‍याला आल्या विरुद्ध रचलेला कट भाग असल्याचे सांगितले. कर्मचार्‍यांनी जरी लेखणी बंद आंदोलनाचे निवेदन दिले आहे. परंतु, ते प्रत्यक्षात काम करीत आहे. त्यामुळे त्यांना कोणीतरी दबाव आणून हे निवेदन द्यायला लावल्याचे स्पष्ट होते असे नगराध्यक्ष ठाकरे म्हटले. मुख्याधिकारी नेहा आकोडे या कायदेशीर रित्या नगरपरिषदेमध्ये कार्य करीत नाही.
 
 
अध्यक्षाला कोणत्याही कामाची माहिती न देता ते परस्पर गुप्त पद्धतीने कामे करतात हा सर्रास नियमाचा उल्लंघन आहे. क गट नगरपालिकेमध्ये मुख्याधिकार्‍यांना चार चाकी वाहन वापरू शकत नाही कारण त्याचा खर्च नगरपालिकेला परवडण्यासारखे नसते. परंतु, मुख्याधिकारी नेहा आकोडे मुख्यालयी राहत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. उपाध्यक्ष राहुल चोपडा यांनी पत्रकार परिषदेत केलेले आरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. लिफ्ट बसविण्याचा कोणताही प्रस्ताव नगरपालिकेच्या आमसभेत घेण्यात आला नव्हता. चोपडा खोटे बोलत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जनतेच्या कामासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करीन असा इशारा त्यांनी दिला.