तज्ञ नसताना बालरोग तज्ञ फलक लाऊन रुग्णांची फसवणूक

डॉटरला आरोग्य विभागाची नोटीस

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
कारंजा लाड,

Fake pediatrician तालुयातील कामरगाव येथे बी. ए. एम. एस. पदवी असताना स्वतःला ‘बालरोग तज्ञ’ म्हणून दर्शवत एक खासगी डॉटर वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचा प्रकार समोर आल्याने तालुका आरोग्य विभागाने संबंधित डॉटरला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, कारंजा यांनी खाजगी वैद्यकीय व्यवसायिक डॉ.गणेश ओवर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे.
 

 Fake pediatrician, unqualified doctor, BAMS degree, 
नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे,कामरगाव येथे दवाखाना चालवित असताना दवाखान्याच्या फलकावर बी. ए. एम. एस. पदवी दर्शविण्यात आली आहे. मात्र अतिरिक्त शैक्षणिक पात्रता नसताना ‘बालरोग तज्ञ’ असा उल्लेख केल्याचे आढळून आल्याने ही बाब गंभीर मानण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या मते, अशा प्रकारे चुकीची माहिती देऊन वैद्यकीय सेवा देणे हे समाजाच्या आरोग्यासाठी धोकादायक असून, ते बोगस वैद्यकीय व्यवसायाच्या स्वरूपात येऊ शकते. त्यामुळे संबंधित डॉटरविरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रॅटिशनर्स अ‍ॅट १९६१ मधील कलम ३३, ३४, ३६ व ३८ अंतर्गत फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान या नोटीसीची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद वाशीम, तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती कारंजा यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे. या प्रकरणामुळे ग्रामीण भागात सुरू असलेल्या कथित बोगस डॉटरांविरोधात आरोग्य विभाग कारवाईचा बडगा उगारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
चौकशीअंती कारवाई...संबंधित डॉटरला चौकशीसाठी गुरुवार १२ मार्च रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. परंतु सदर डॉटर बाहेरगावी असल्याने पुढील दोन दिवसात कसून चौकशी करून नियमानुसार कारवाई केल्या जाईल.
डॉ. शंकर नांदे, तालुका आरोग्य अधिकारी कारंजा