११२ वर गोळ्या झाडल्याची खोटी माहिती देणे भोवले

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
false-information-about-shots : पोलिस विभागाच्या वतीने आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल ११२ कार्यान्वित करण्यात आली आहे. पण याच ११२ क्रमांकावर बंदुकधारी तीन अज्ञातांपैकी एकाने देवळी-रत्नापूर मार्गावर गोळ्या झाडल्याची माहिती महेश जुमळे याने दिली. पोलिसांनी पडताळणी केल्यावर ही अशी कुठलीही घटना घडली नाही. खोटी माहिती देण्यात आल्याचे पुढे आल्याने महेश जुमळे यास कानगाव येथून ताब्यात घेत याच्याविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज १३ रोजी घडली.
 
 
k
 
 
नागरिकांना तातडीने पोलिसी मदत मिळावी यासाठी डायल ११२ ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ११२ च्या नियंत्रण कक्षाला महेश जुमळे याने कॉल करून देवळी-रत्नापूर मार्गावर महेशच्या वाहनाला तिघे बसून असलेल्या दुसर्‍या एका वाहनाने धडक दिली. त्यांच्याकडे बंदुक आहे. त्यांनी महेश यांच्यावर फायर केला. शिवाय गोळी झाडून तिघेही यवतमाळकडे पळाल्याचे सांगितले. माहिती मिळताच देवळी व पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी माहितीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता ती खोटी असल्याचे पुढे आले. त्यानंतर महेश जुमळे याच्याशी पोलिसांनी संपर्क साधला असता त्याने मी घटनास्थळी येऊ शकत नसल्याचे सांगत उडवा-उडवीचे उत्तर दिली. शिवाय तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही पुढे आले. त्याला कानगाव येथून तब्यात घेत देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.