घाटंजी सीसीआयची कापूस खरेदीत मनमानी

-कापूसगाडी परत घेऊन जाण्यास करतात प्रवृत्त -भारतीय किसान संघाचे तहसीलदारांना निवेदन

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पारवा, 
ghatanji-cci : यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे सुरू असलेल्या कापूस खरेदीत संबंधित सीसीआय कर्मचारी मनमानी कारभार करत असून त्यांनी शेकडो कापूस उत्पादक शेतकèयांना वेठीस धरले आहे, अशी तक्रार भारतीय किसान संघाने केली आहे. बरेच शेतकरी बुधवार, 11 मार्चच्या रात्रीपासून आपापल्या कापूसगाड्या घेऊन नंबर लावण्यास उभे होते. परंतु त्यापैकी काही लोकांचे नंबर लागले. पण काहींच्या बाबतीत टाळाटाळीची भाषा करण्यात येऊन गाड्या परत पाठवण्यात येत होत्या, अशी तक्रार शेतकरी संदीप ओंकार काकडे यांनी केली आहे.
 
 
y13March-Parawa
 
कापसाची गुववत्ता ठरविणारे कर्मचारी त्यांच्या मनानेच, मनमानी पद्धतीनेच हे काम करतात आणि कापूस परत पाठवण्यास सांगतात. याबाबत कास्तकारांनी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि तहसील कार्यालयातसुद्धा तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे इथेच पावती वगैरे देतानासुद्धा त्यावर खोडतोड केल्या जात असल्यामुळे शेतकèयांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकèयांचा चांगल्या गुणवत्तेचा कापूस कमी दर्जाचा दाखवल्या जाऊन त्यांची पिळवणूक केल्या जाते. परंतु याच ठिकाणी व्यवसायी, व्यापारी यांचा कापूस हा उच्च दर्जाचा दाखवून, संगनमताने सर्वसामान्य शेतकèयांची पिळवणूक केल्या जात असल्याच्याही तक्रारी आहेत.
 
 
येथील मीनाक्षी जिनिंगमध्येसुद्धा कास्तकारांची पिळवणूक केली जात असल्याचे चित्र आहेत. या ठिकाणी ग्रेडरने करावयाचे काम त्यांचे अनधिकृत सहायक करतात, कास्तकारांच्या पावतीवर खोडतोड करतात अशीही तक्रार कापूस उत्पादक भारत रोकडे यांनी केली आहे. नंदू श्रावण सातपुते व देवराव काकडे याही कापूस उत्पादकांनी आपल्या पावत्यांवर खोततोड केल्याची तक्रार केली आहे.