इस्रायली हल्ल्यात इराणचे अणुशास्त्रज्ञ ठार!

बेंजामिन नेतान्याहू यांचा दावा

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Iranian nuclear scientist killed in attack मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र होत असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणविरुद्ध मोठा दावा केला आहे. इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणचे काही अणुशास्त्रज्ञ ठार झाले असून अनेक जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आणि इराणच्या नेतृत्वावर तीव्र टीका केली. या वेळी नेतान्याहू यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी खामेनी यांना इराणच्या क्रांतिकारी रक्षक दलाचे केवळ कठपुतळी नेतृत्व असल्याचा आरोप केला. इराण दीर्घकाळापासून अण्वस्त्र विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इस्रायल आणि अमेरिकेकडून वारंवार केला जात आहे. त्यामुळे इराणला अण्वस्त्र कार्यक्रम पुढे नेण्यापासून रोखण्यासाठी इस्रायलने हल्ले तीव्र केले असल्याचेही त्यांनी सूचित केले.
 
 
killed in attack
 
नेतान्याहू यांनी इराणमधील जनतेलाही थेट संदेश दिला. स्वातंत्र्याकडे नेणारा नवा मार्ग आता जवळ आला आहे आणि त्या मार्गावर इस्रायल तुमच्या पाठीशी उभा आहे, असे त्यांनी म्हटले. मात्र शेवटी बदल घडवून आणण्याची जबाबदारी इराणच्या लोकांवरच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या संघर्षात इराणनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिका आणि इस्रायलवर दबाव आणण्यासाठी इराण आखाती प्रदेशातील काही अरब देशांवर हल्ले करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या धुनिला सामुद्रधुनी या सामुद्रधुनीला बंद करण्याचा इशाराही इराणने दिला आहे.
 
 
युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अली खामेनेई मृत्यू झाला असावा, असा संशय काही पाश्चिमात्य देशांनी व्यक्त केला आहे. त्याच वेळी मोज्तबा खामेनी जखमी झाल्याचीही चर्चा होती. त्यानंतर मोज्तबा खामेनेई सार्वजनिक ठिकाणी फारसे दिसले नसल्यामुळे या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे. मध्यपूर्वेतील या वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.