इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई कोमात? एक पाय गमावल्याचा दावा

प्रकृतीवरून वाढली चिंता

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
तेहरान, 
mojtaba-khamenei-in-coma नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांच्याबाबत सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत तसेच त्यांच्या नव्या छायाचित्रांबाबत वेगवेगळे दावे पाश्चात्य माध्यमांतून पुढे येत आहेत. काही अहवालांनुसार ते गंभीर जखमी असून बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे, तर एका पाय कापावा  लागल्याचाही दावा केला जात आहे. मात्र या सर्व दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
 
mojtaba-khamenei-in-coma
 
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या संदर्भात विधान केले आहे. त्यांच्या मते मोज्तबा खामेनेई कदाचित जिवंत असू शकतात, मात्र ते गंभीर जखमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. mojtaba-khamenei-in-coma त्यांनी असेही म्हटले की ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जिवंत असावेत, पण त्यांच्या प्रकृतीची खरी स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. ही चर्चा २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई हल्ल्यानंतर सुरू झाली. या हल्ल्यात इराणचे माजी सर्वोच्च नेते अली मोज्तबा यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर काही दिवसांनी मोज्तबा खामेनेई यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली. मात्र पदभार स्वीकारल्यानंतर ते अद्याप सार्वजनिकरित्या कुठेही दिसलेले नाहीत.
काही सूत्रांच्या माहितीनुसार ते तेहरानमधील सिना विद्यापीठ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयाचा एक भाग कडक सुरक्षेत ठेवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यांच्या पोटाला आणि यकृतालाही दुखापत झाल्याचे काही अहवालांत नमूद केले गेले आहे. mojtaba-khamenei-in-coma मोज्तबा खामेनेई यांच्या नव्या छायाचित्रावरूनही वाद निर्माण झाला आहे. काही तपासांमध्ये असे आढळल्याचा दावा करण्यात आला की हे छायाचित्र प्रत्यक्षात जुने असून त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने बदल करण्यात आले असावेत. छायाचित्रातील पार्श्वभूमी काढून ते नव्याने तयार केलेल्या चित्रासारखे सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे छायाचित्र इराणी सरकारी माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले होते आणि त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या एका सामाजिक माध्यम खात्यावरही ते प्रसिद्ध करण्यात आले होते. mojtaba-khamenei-in-coma या खात्याचे संचालन परदेशातून होत असल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, इराणी राज्य दूरचित्रवाणीवर काही सूत्रधार मोज्तबा खामेनेई यांचा उल्लेख ‘रमजानचा जखमी योद्धा’ असा करत आहेत. मात्र ते प्रत्यक्षात हल्ल्यात जखमी झाले होते की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर ते सार्वजनिकरित्या दिसले नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच छायाचित्रांवरील वाद आणि प्रकृतीबाबतच्या दाव्यांमुळे या प्रकरणाभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे.