सडक अर्जुनीत सिलेंडर गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे निवेदन

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
सडक अर्जुनी,
LPG gas price hike केंद्रातील नरेंद मोदी सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ सडक अर्जुनी काँग्रेस कमिटीने तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेवर, विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपये भाववाढ करण्यात आली. तसेच व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही ११५ रुपयांपर्यंत वाढ झाल्याने हॉटेल्स, छोटे व्यवसाय आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा या निर्णयाच्या विरोधात येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने १२ मार्च रोजी स्थानिक तहसीलदार यांना महामहीम राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले.
 


LPG gas price hike 
सादर निवेदनानुसार घरगुती गॅस सिलेंडरच्या ६० रुपयांच्या दरवाढ मागे घ्यावी. हॉटेल रेस्टॉरंट, इतर कामगार, विद्यार्थी, हॉस्टेल, यांचे जेवणाला फटका बसत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. शहरात आणि ग्रामीण भागात गॅस सिलिंडर चा तुटवडा जाणवत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला पुरवठा नियमित सुरू करण्यात यावे, तसेच कॅटरर्स व्यावसायिक रेस्टॉरंटला बंद केलेल्या पुरवठा नियमित करण्यात यावे या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी निवेदन देताना काँग्रेस तालुका अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, गोंदिया मध्यवर्ती बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर, दामोदर नेवारे, किशोर शेंडे, अर्जुन घरोटे, अनिल मेश्राम, स्वप्नील ब्राह्मणकर, संतोष लाडे, वीरू गौर, गायत्री इरले, पुष्पा खोटेले, किरण हटवार, शिल्पा चांदेवार, भोजराज मसराम, रवींद्र अंबुले, नेतलाल ठाकरे, देवचंद शिवणकर, धनराज आसटकर आणि इतर काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते .