निष्काळजीपण करणाऱ्या आरोग्य सेविकेवर कठोर कारवाई

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
जळगाव
Meenal Karnwal रावेर तालुक्यातील गारखेडा आरोग्य उपकेंद्रात 10 मार्च रोजी घडलेल्या दुर्दैवी प्रसूती प्रकरणानंतर प्रशासनाने निष्काळजीपण करणाऱ्या आरोग्य सेविकेवर कठोर कारवाई केली आहे. या घटनेत नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी तातडीने कंत्राटी आरोग्य सेविका नंदा पाटील यांना त्यांच्या सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे.
 

Meenal Karnwal Jalgaon district administration 
माहितीप्रमाणे, रावेर तालुक्यातील रुकसान येथील अजित तडवी यांच्या पत्नीला मध्यरात्री प्रसूती वेदना सुरू झाल्या. आशा सेविकेने तिला गारखेडा आरोग्य उपकेंद्रात दाखल केले, तसेच कंत्राटी आरोग्य सेविकेला फोनवर या घटनेची माहिती दिली. मात्र, नंदा पाटील त्या वेळेस मुख्यालयी नसल्याने प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाहीत. तब्बल परिस्थितीत असलेल्या गर्भवती महिलेच्या प्रकृतीचा विचार न करता आशा सेविकेने स्वतःच्या प्रशिक्षणाचा वापर करून उपकेंद्रातील साधनसामग्रीच्या मदतीने प्रसूती केली.रात्री एकच्या सुमारास प्रसूती झाल्यानंतर नवजात बाळ रडत नसल्याचे लक्षात येताच, आई व बाळाला पाल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सावदा येथे हलवले असता, दुर्दैवाने रस्त्यातच नवजात बाळाचा मृत्यू झाला. या घटनेने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जिल्हा परिषद प्रशासनाने Meenal Karnwal  प्रकरणाची सखोल चौकशी केली. प्राथमिक चौकशीत नंदा पाटील मुख्यालयी नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे प्रशासनाने गंभीर दखल घेत बडतर्फीची कारवाई केली. प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, यापुढे अशा प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात वेळेवर हजर राहणे अनिवार्य आहे.जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम आणि तत्पर राहण्यासाठी पुढील काळात आवश्यक उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होत असताना, अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासन सजग राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.