दुर्गा माता मंदिरासाठी विटांचे योगदान

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Prakash Educational Society शहरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रकाश एज्युकेशनल सोसायटीने प्रकाश नगर येथील श्री दुर्गा माता मंदिराच्या भव्य उभारणीसाठी विटांचे योगदान दिले.मंदिराच्या बांधकाम समितीकडे या विटा सुपूर्द करताना सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सूर्य प्रकाश यादव यांनी मंदिरे ही केवळ श्रद्धेची केंद्रे नसून समाजातील एकता व सकारात्मकतेचे आधारस्थान असल्याचे सांगितले. प्रकाश नगर येथील या पवित्र मंदिराच्या उभारणीत ‘खारीचा वाटा’ उचलण्याची संधी मिळणे ही सोसायटीसाठी भाग्याची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

27 
 
 
मंदिराच्या बांधकाम समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या सहकार्याबद्दल प्रकाश एज्युकेशनल सोसायटीचे आभार मानले.Prakash Educational Society डॉ. सूर्य प्रकाश यादव व त्यांच्या सहकाऱ्यांची टीम सामाजिक आणि लोककल्याणाच्या उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसंगी मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते. मंदिराचे बांधकाम यशस्वीरीत्या पूर्ण व्हावे आणि जनसामान्यांचे कल्याण व्हावे, यासाठी प्रार्थना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सौजन्य : हरीश जोगळेकर ,संपर्क मित्र