महसूल कर्मचाऱ्यांनी स्वीकारली 50 हजारांची ‘लाच’

दोन जण ताब्यात : कळंब तालुक्यातील प्रकरण

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
revenue-officials-accepted-a-bribe : कळंब तालुक्यातील मेंढला शिवार येथील शेतखरेदीचे सौदेपत्र भोगवटदार 2 मधून भोगवटदार 1 मध्ये करण्यासाठी मूळ शेतमालकाकडून 75 हजार रुपये लाच महसूल विभागातील कर्मचाèयांनी मागितली होती. तडजोडीअंती 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरिष्ठ लिपिक राहुल कुयटे व महसूल सहायक गोपाळ मोहाडे यांना फे्रंडस बार स्टेट बँक चौक येथे लाचलुचपत विभागाने शुक्रवार, 13 मार्च रोजी ताब्यात घेतले.
 

kl
 
तक्रारदारांनी कळंब तालुक्यातील मेढला शिवार येथील शेतखरेदीचे सौदेपत्र तयार केले आहे. शेतजमीन भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी मूळ शेतमालकाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज केला होता.
 
 
या अर्जाचा पाठपुरवठा करताना तक्रारदारांनी काही दिवसांपूर्वी महसूल सहायक गोपाळ मोहाडे याची महसूल कार्यालयात भेट घेतली असता, त्याने हे प्रकरण निकाली काढून शेत भोगवटदार वर्ग 2 वरून भोगवटदार वर्ग 1 चा आदेश काढण्यासाठी 75 हजार रुपये लाचेची मागणी केली.
 
 
ही रक्कम कार्यालयातील जुना लिपिक राहुल अरुण कुयटे याला देण्यास सांगितले, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यवतमाळ येथे दिली होती. त्यावरून पडताळणी केली असता आरोपी गोपाळ मोहाडे याने रकमेसंबंधाने आरोपी राहुल कुमरे याची भेट घेण्यास सांगितले होते.
 
 
आरोपी राहुल कुयटे याने तक्रारदारांना त्यांचे प्रलंबित काम निकाली काढण्यासाठी आरोपी गोपाळ मोहाडे याच्यासाठी तडजोडीअंती लाच रक्कम 50,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
 
 
कारवाई दरम्यान 50,000 रुपये फे्रंडस बार येथे तक्रारदाराकडून स्वीकारल्याने या दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांना पुढील कायदेशीर कारवाईकरिता ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
ही कारवाई पोलिस निरीक्षक अभय आष्टेकर, अर्जुन पनघट, जयंत ब्राम्हणकर, अब्दुल वसीम, संजय भुजाडे, सचिन भोयर, ईफराझ काझी, भागवत पाटील, आकाश सहारे, मनीषा राजुरकर व अतुल नागमोते यांनी यशस्वी पार पाडली.