नागपूरमध्ये तीन दिवसीय हिंदू संमेलन

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Hindu conference in Nagpur नुकत्याच पार पडलेल्या तीन दिवसीय हिंदू संमेलनात श्रद्धा, दान, सेवा आणि भक्तीचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. माता-पित्यांच्या आशीर्वादाने, तरुणांच्या जोशाने आणि वृद्धांच्या प्रार्थनेने संमेलन यशस्वी झाले. या कार्यक्रमात सहभागी प्रत्येक व्यक्तीच्या समर्पणामुळे आणि प्रेमामुळेच संमेलन भव्य झाले, असे आयोजकांनी सांगितले. संकल्प, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाचा त्रिवेणी संगम अनुभवताना उपस्थितांनी संपूर्ण तीन दिवस घरच्या लग्नासारखे झोकून दिले. पहिला दिवस: संत गजानन महाराजांच्या पोथी पारायणात ६३० विविध समाजातील भक्तांचा सहभाग झाला. मंडपातील शांतता आणि भक्तीने सर्व उपस्थितांचे हृदय भारावून टाकले.
 
Nagpur
 
दुसरा दिवस: २८ जोडप्यांनी भव्य विष्णू यज्ञ केले. मंत्रपोचार आणि यज्ञाच्या सुगंधाने वातावरण शुद्ध-पवित्र झाले. १९ भजनमंडळींनी ३०० महिलांसह भक्तीगाथा गायल्या, तर ह. भ. प. दिगंबर बुवांचे कीर्तन उपस्थितांना भक्तीची लहर अनुभवायला लावणारे ठरले. तिसरा दिवस: फलश्रुतीसोहळ्यात प. पू. जितेंद्रनाथ महाराजांचे आशीर्वाद आणि शिरीषजींचे उद्बोधन झाले. Hindu conference in Nagpur या दिवशी ९७० भक्त उपस्थित होते. संघटनेने आपल्या सर्व सदस्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले आहेत. “जाग रहा है, जनगणना मन निश्चित होगा परिवर्तन” या विश्वासाने पुन्हा एकत्र येण्याचे आवाहनही केले आहे.
सौजन्य: मकरंद भालेराव, संपर्क मित्र