इराणशी युद्धादरम्यान अमेरिकेचे विमान कोसळले, चार जण ठार

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
वॉशिंग्टन, 
us-plane-crashes-during-war इराणवर संयुक्त हल्ला करणाऱ्या अमेरिका आणि इस्रायल यांनाही युद्धात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत या संघर्षात चार अमेरिकन विमान अधिकृतपणे पाडण्यात आली आहेत, तर एका महागड्या हवाई संरक्षण प्रणालीचा रडारही नष्ट झाला आहे. यूएस सेंट्रल कमांडने शुक्रवारी चौथ्या विमानाच्या अपघाताची माहिती दिली. या अपघातात इंधन भरणाऱ्या विमानातील सहा क्रू सदस्यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात शत्रू किंवा अमेरिकेच्या गोळीबाराचा सहभाग नव्हता. सेंटकॉमच्या मते, अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
 
us-plane-crashes-during-war
 
घटनेची अधिक माहिती देताना सेंटकॉमने सांगितले की अपघातात दोन विमाने गुंतली होती. क्रॅश झालेले विमान, बोईंग केसी-१३५, इराणमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन्सचा भाग होते आणि ते इतर जेट विमानांना हवेत इंधन भरणारे टँकर विमान होते. अपघातानंतर बचाव कार्य सुरु आहे, तर दुसरे विमान सुरक्षितपणे उतरले. us-plane-crashes-during-war सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओ आणि फोटो तेल अवीव विमानतळावर दुसरे अमेरिकन टँकर विमान उतरताना दाखवतात, ज्यामध्ये विमानाच्या मागील भागाचे नुकसान स्पष्ट दिसते. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, दोन इंधन टँकर हवेत आदळल्यामुळे एक अपघात झाला, तर दुसरे विमान सुरक्षित उतरल्यानंतर बचाव कार्य सुरू ठेवले गेले. अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही, पण या संघर्षात एकूण चार अमेरिकन विमाने गमावली गेली आहेत. केसी-१३५ पाडण्यापूर्वी, कतारी हवाई दलाच्या चुकीमुळे तीन अमेरिकन एफ-१५ विमान आधीच पाडण्यात आली होती.