ग्राममहसूल अधिकारी श्रीकांत निमगडे निलंबित

-समाजमाध्यमांवर मुख्यमंत्री, प्रधानमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणे भोवले

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
नेर,
srikant-nimgade-suspended : तालुक्यातील दगडधानोरा येथे ग्राममहसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेला श्रीकांत निमगडे याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीच्या खासदार मेधा कुलकर्णी व महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह टीकाटिप्पणी करणारे व्हॉटसअप स्टेटस व संदेश तथा हिंदू देवदेवतांवर टीका करणारे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित केल्याची तक्रार भारतीय जनता पार्टी नेरपरसोपंतच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकाèयांकडे सबळ पुराव्यानिशी केली होती.
या तक्रारीची जिल्हाधिकारी विकास मिना यांनी दखल घेत हा शासकीय कर्मचारी श्रीकांत निमगडे याची वर्तणूक कृती कर्तव्यात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता न राखणारी असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 3 (एक) (दोन) (तीन) चा भंग केल्यामुळे शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित असल्याचे आदेशात नमूद आहे.
 
 
y13March-Nimgade
 
महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 च्या कलम 4 अन्वये तत्काळ प्रभावाने श्रीकांत निमगडे याच्यावर निलंबन कारवाई करण्यात आली असून त्याला निलंबन कालावधीत दारव्हा मुख्यालयी उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
 
 
शुक्रवार, 13 मार्च रोजी नेर शहर भाजपा मंडळ अध्यक्ष आशिष खोडे यांनी नेर तहसील कार्यालयातही श्रीकांत निमगडेच्या विरोधात अशाच स्वरूपाचे निवेदन दिले असून यावेळी महिला मोर्चा अध्यक्ष तथा नगरसेवक सोनाली गुल्हाने, राजेश गुगलिया, श्याम ठाकरे, राजेंद्र निघोट, अतुल कावरे, गौरव राऊत यांची उपस्थिती होती.