दिघोरीत महिला दिनानिमित्त भव्य रॅली व सांस्कृतिक कार्यक्रम

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Ward No. 28 Dighorप्रभाग क्रमांक २८ दिघोरी परिसरात नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या सौजन्याने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महिलांची भव्य स्कूटर व बाईक रॅली काढण्यात आली. महिलांनी पारंपारिक वेशभूषा व फेटा धारण करून रॅलीत सहभाग घेतला. काही महिलांनी बुलेटवरूनही रॅलीत भाग घेतला.
 

sr 
 
 
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नृत्य स्पर्धा, आनंद मेळावा तसेच विविध वस्तूंचे प्रदर्शन यासारखे उपक्रम घेण्यात आले.Ward No. 28 Dighor कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.यावेळी नागपूरच्या महापौर निता ठाकरे, सविता मोहन मते व इतर मान्यवर उपस्थित होते. परिसरातील महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य:अंशुल जिचकार ,संपर्क मित्र