वर्धा,
wardha-book-festival : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा वाचनालय येथे १४ व १५ मार्च रोजी वर्धा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, विदर्भ साहित्य संघ, सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा वाचनालय व जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालय व काही शाळांच्या सहकार्याने आयोजित वर्धा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शनिवार १४ रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार आहे.

अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. अमर काळे, आ. दादाराव केचे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हाधिकारी वान्मथी सी., शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री घारफळकर, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, सहाय्यक ग्रंथालय संचालक रामदास साठे, विदर्भ साहित्य संघ वर्धाचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रदीप बजाज, आदींची उपस्थिती राहणार आहे.
सकाळी ८ वाजता डॉ. गजानन कोटेवार यांच्या हस्ते लोक विद्यालय येथून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता संजय इंगळे तिगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता गजानन मुटे यांच्या अध्यतेखाली गझल मुशायराचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार १५ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दिशा या विषयावर परिसंवाद, दुपारी ३ वाजता कवी व अभिनेते किशोर बळी यांचा सारं गाव मामाचं हा एकपात्री प्रयोग तर सायंकाळी ५ वाजता उत्कृष्ट वाचक सन्मान व सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.