पाकिस्तानी खेळाडूच्या का खरेदी केले?

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Why did you buy Pakistani players? इंग्लंडमध्ये होणाऱ्या प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धेच्या लिलावात पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला मोठ्या रकमेवर खरेदी झाल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीच्या संघाने त्याला सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेवर आपल्या संघात घेतले. या निर्णयामुळे विशेषतः भारतात सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा रंगली असून संघाच्या व्यवस्थापनावर टीकेची झोड उठली आहे, या पार्श्वभूमीवर संघाचे प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरीयांनी प्रथमच याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की पाकिस्तानी खेळाडूंना करार देऊ नये असा कोणताही आदेश संघ व्यवस्थापनाकडून कधीही मिळाला नव्हता. लिलावाच्या आधी संघाने उपलब्ध असलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय फिरकी गोलंदाजांचा विचार केला होता आणि त्यामध्ये अबरार अहमद हा त्यांचा पहिला पर्याय होता, असेही त्यांनी सांगितले.
 
 
 Pakistani players abraham
 
व्हेटोरी यांच्या मते, लिलावासाठी तयारी करताना संघाने विविध देशांतील अनेक खेळाडूंची यादी तयार केली होती. मात्र फिरकी गोलंदाजांच्या बाबतीत अबरार अहमदचे नाव सर्वात वर होते. त्यामुळे संधी मिळताच त्याला संघात घेण्यासाठी व्यवस्थापनाने जोरदार प्रयत्न केले. दरम्यान, संघाची मालकी असलेल्या काव्या मारन यांच्या निर्णयावर सामाजिक माध्यमांवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काही चाहत्यांनी भारतीय मालकीच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूला इतक्या मोठ्या रकमेत घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तथापि, व्हेटोरी यांच्या विधानानंतर हा निर्णय संघाच्या मुख्य क्रिकेट विभागाने आधीच ठरवला होता आणि त्यावर कोणतेही राजकीय किंवा इतर निर्बंध नव्हते, हे स्पष्ट झाले. लिलावात अबरार अहमदची सुरुवातीची किंमत तुलनेने कमी होती, मात्र त्याला मिळवण्यासाठी इतर संघांशी तीव्र स्पर्धा झाली. शेवटी दीर्घ बोली लढतीनंतर सनरायझर्सच्या संघाने मोठी रक्कम मोजून त्याला आपल्या संघात सामील केले. त्यामुळे या खरेदीची चर्चा क्रिकेटविश्वात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.