जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Womens Day जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महिलांचा सत्कार करण्यात आला. समितीच्या सदस्य लता उमाकांत ढोक यांच्या नेतृत्वाखाली बहादुरा येथील त्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमास विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत महिलांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितींमध्ये वृंदा ठाकरे, स्वाती नाखरे, दर्शना मेश्राम, यशोधरा फुलझेले, पूजा प्रीतम कापसे, संघमित्रा मस्के यांचा समावेश होता.
 
nagpur
 
सत्कार करण्यात आलेल्या महिलांमध्ये सुनिता शंभरकर (आशावर्क), सुनिता हरडे (ऑटो चालक), अर्चना धनविजय (घरकाम), सुषमा गायधने (सामाजिक कार्यकर्ते), माया मेश्राम (सामाजिक कार्यकर्त्या), मानसी कुचेकर, पूजा नंदागवळी यांचा समावेश होता. Womens Day  याशिवाय कार्यक्रमास उपस्थित होत्या सुषमा भोसारे, अनिता कांबळे, मंगला लाडे, ज्योती शाहारे, भारती झिलकरवार, सविता बोकाडे, कमल बोडाळे, रिमा बडगे, ज्योत्सना मेश्राम, रिंकी तिवारी, वर्षा झझांड, वैशाली जगताप, माधुरी कावळे, सुनंधा जाधव, संगीता नरड, सुधाकर लोखंडे, उज्वला निकोशे, सुषमा भैसारे, प्रीती भागजकर. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लता ढोक यांनी केले, संचालन पूनम ठोक यांनी केले, तर आभार प्रदर्शन पूजा नंदागवळी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम महिला कार्यकर्त्यांच्या योगदानाला गौरविण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र