मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
न्यु एरा क्लिनटेक व ग्रेटा एनर्जीच्या प्रकल्पाचे भुमिपूजन
चंद्रपूर,
coal gasification projects जगातील उत्तम तंत्रज्ञान वापरून देशात ‘कोल गॅसिफिकेशन’चे प्रकल्प येणार याचा वेळीच वेध महाराष्ट्राने घेतला. तशा व्यवस्था उभ्या केल्या. त्यामुळे देशातील 7 पैकी 4 प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात होत आहेत. राज्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत, जगात 30 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था उभी केली आहे. शेती, उद्योग, सेवाक्षेत्र सर्वच क्षेत्रात गुंतवणूक करून रोजगार निर्मितीच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणखी पुढे नेण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भद्रावती एमआयडीसी परिसरात न्यू एरा क्लिनटेक प्रा. लि. आणि ग्रेटा एनर्जी प्रा. लि. च्या एकात्मिक हरीत पोलाद प्रकल्पाचे भुमिपूजन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, खा. प्रतिभा धानोरकर, आ. किशोर जोरगेवार, coal gasification projects आ. देवराव भोंगळे, आ. करण देवतळे, माजी मंत्री हंसराज अहीर, माजी खासदार अजय संचेती, कोल इंडियाचे चेअरमन संजीव कुमार झा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, ग्रेटा एनर्जीचे चेअरमन नितेश चौधरी, वैभव काकुलते, वेकोलिचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत पांडे, ग्रेटा एनर्जीचे अनुप गोयल, न्यू एरा क्लिनटेकचे बाळासाहेब दराडे, मधुसूदन अग्रवाल आदी उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, वातावरण बदल हा जगासमोर मोठा प्रश्न आहे. त्याचा फटका शेतीसोबतच उद्योगांनासुध्दा बसतो. त्यामुळे खनिज संपत्तीचा प्रदुषणमुक्त उपयोग करण्यावर भर देण्यात आला आहे. coal gasification projects याच मांदियाळीत ‘कोल गॅसिफिकेशन’चे सात प्रकल्प येत आहेत, त्यापैकी चार प्रकल्प महाराष्ट्रात आणि तेही विदर्भात होणार आहे. हा धोरणात्मक निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या दोन्ही उद्योगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर पडणार आहे.
विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया येथे ‘स्टील हब’ तयार होत आहे. या परिसरात तीन लक्ष कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून, एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. न्यू एरा आणि ग्रीन एनर्जी या दोन्ही उद्योगांच्या माध्यमातून या परिसरात 10 हजार रोजगार उपलब्ध होईल. तंत्रज्ञ व इतर नोकरीसाठी चंद्रपूर व आसपासच्या गावातील तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा. coal gasification projects राष्ट्रकार्य पूर्ण करायचे असेल, तर 70 ते 80 टक्के स्थानिकांना रोजगार देणे आवश्यक आहे. उद्योगांच्या पाठीशी सरकार नेहमीच उभे आहे. उद्योगाच्या ईको सिस्टीमचा फायदा येथील स्थानिकांना झाला पाहिजे. या दोन प्रकल्पामुळे चंद्रपूरचे नाव देशाच्या नकाशावर झळकले आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
औद्योगिक विकासात कोळशाची भुमिका महत्वाची : किशन रेड्डी
महाराष्ट्र हे औद्योगिकद्दष्ट्या प्रगत राज्य आहे. एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. coal gasification projects ज्यांनी भद्रावतीच्या या दोन प्रकल्पासाठी जमीन दिली, त्यांनी देश निर्माण करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पात स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार द्यावा तसेच वेळेपूर्वी हा प्रकल्प पूर्ण करावा, अशी आशा किशन रेड्डी यांनी व्यक्त केली.