युद्धाचा फटका ... एअर फ्लाइट टिकट महागणार

फ्यूल सरचार्ज ₹199 ते ₹1300 पर्यंत लागू

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
मुंबई
Air ticket price भारतीय विमानसेवा कंपनी अकासा एअरने आपल्या सर्व डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी फ्यूल सरचार्ज लागू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की, १५ मार्च २०२६ पासून बुक होणाऱ्या प्रत्येक तिकिटावर ₹199 ते ₹1300 पर्यंतचा फ्यूल सरचार्ज वसूल केला जाईल.
 

Akasa Air ticket price hike,  
अकासा एअरच्या मते, विमानसेवेतील एकूण खर्चात इंधनाचा हिस्सा मोठा आहे. मध्य पूर्वेतून सुरू असलेल्या राजकीय तणावामुळे एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) च्या किंमतीत मोठी वाढ झाली असून, यामुळे विमान कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांवर थेट फ्यूल चार्ज लावण्याचा निर्णय घेतला गेला आहे.अकासा एअर आधीच एअर इंडिया आणि इंडिगो सारख्या देशातील इतर प्रमुख विमानसेवा कंपन्या प्रवाशांकडून फ्यूल सरचार्ज घेत आहेत. एयर इंडियाने १२ मार्चपासून फ्यूल सरचार्ज ₹399 ते ९० डॉलर (सुमारे ₹8332) पर्यंत लावला आहे. तर इंडिगो १४ मार्चपासून ₹425 ते ₹2300 पर्यंत फ्यूल चार्ज वसूल करत आहे.
एटीएफ म्हणजेच हवाई Air ticket price जहाजासाठी वापरला जाणारा इंधन ही कच्च्या तेलापासून तयार केला जातो. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे १०० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचल्या आहेत. इंडिगोने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, IATA च्या 'जेट फ्यूल मॉनिटर' नुसार या क्षेत्रात ईंधनाच्या किमतीत ८५% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, ज्याचा थेट परिणाम सर्व विमान कंपन्यांच्या ऑपरेशन खर्चावर होत आहे.यामुळे प्रवाशांना आता तिकिटाच्या मूळ किमतीसह अतिरिक्त फ्यूल सरचार्ज देावा लागणार आहे, आणि येणाऱ्या काळात हवाई प्रवास महाग होण्याची शक्यता आहे.