राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यवाहांच्या घरावर हल्ला!

बिजनौर मध्ये तणाव

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
बिजनौर,
Attack on Rashtriya Swayamsevak Sangh worker's house उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील धामपूर परिसरात पहाटे घडलेल्या एका घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह विपिन चौहान यांच्या घरावर काही तरुणांनी हल्ला करून तोडफोड केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेत घरातील सामानाचे नुकसान झाले असून कुटुंबीयांशी गैरवर्तन केल्याचेही सांगितले जात आहे.माहितीनुसार पहाटे साधारण तीनच्या सुमारास काही जणांनी विपिन चौहान यांच्या घरात घुसून गोंधळ घातला. घरातील वस्तूंची तोडफोड करण्यात आली आणि कुटुंबीयांना धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच स्थानिक हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
 
 

Attack on Rashtriya Swayamsevak Sangh worker
 
घटनेनंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काही जणांनी प्रशासनाने आरोपींविरोधात कठोर पावले उचलावीत अशी मागणीही केली. दरम्यान परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांना तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले.पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर काही लोकांनी त्यांच्याशीही वाद घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात शांतता राखण्याचा प्रयत्न केला. स्थानिक आमदार अशोक कुमार राणा देखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोषींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास दिला.
 
 
प्राथमिक माहितीनुसार, शोएब नावाच्या व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी विपिन चौहान यांच्याशी एका मुद्द्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्याने काही सहकाऱ्यांसह घरावर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शोएब आणि सत्तार या दोघांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. धामपूर विभागाचे पोलिस अधिकारी अभय प्रताप पांडे यांनी सांगितले की या घटनेत सहभागी असलेल्या इतर संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे आणि लवकरच त्यांनाही अटक केली जाईल. अफवा पसरू नयेत आणि कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.