भाजपा महिला मोर्चाचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
नागपूर,
BJP Womens भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण महिला मोर्चातर्फे काल (१३ मार्च) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, शहर अध्यक्षा दिव्या धुरडे, मार्गदर्शिका सविता मते, दक्षिण मंडळाच्या पालक व नगरसेविका ज्योती देवघरे, परिवहन समितीच्या अध्यक्षा व नगरसेविका मंगला खेकरे तसेच नवनिर्वाचित सर्व नगरसेविका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या अध्यक्षा किर्ती शेंडे, ज्योत्सना इंगळे आणि वैशाली काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुणा इटनकर, सुनीता चांदपूरकर, जयश्री गभने, जयश्री खंडाळ, सरिता मौर्य, पुष्पा वंजारी तसेच मंडळातील सर्व महिला वॉर्ड अध्यक्षांनी अथक परिश्रम घेतले.
 
BJP Womens
 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करणाऱ्या समाजसेवी महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शहर, मंडळ आणि वॉर्ड पदाधिकारी तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. BJP Womens कार्यक्रमात दक्षिण नागपूरच्या तिन्ही मंडळातील महिला कार्यकर्त्यांनी रणरागिणी, नारीशक्ती, गणेशवंदना, जन्म बाईचा, भारूड आणि कोळी नृत्य यांसारखी दर्जेदार सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली हनोते यांनी केले, तर वैशाली मेनकुदळे यांनी आभार प्रदर्शन केले. अतिशय सुंदर वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडला.
सौजन्य: ज्योत्स्ना इंगळे, संपर्क मित्र