आगळावेगळा जागतिक महिला दिन साजरा

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
नागपूर,
International Womens Day श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ, श्यामनगर–मनीषनगर, नागपूर यांच्या महिला विभागातर्फे यंदाचा जागतिक महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने “सुखद भावनांची बरसाद” हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात १० जोडप्यांनी आपल्या आयुष्यातील सुख-दुःखाच्या प्रसंगांना साजेशा मराठी व हिंदी सिनेगीतांच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण केले. या कार्यक्रमाची संकल्पना, लिखाण, संवाद आणि दिग्दर्शन प्रा. अबोली फाळके यांचे होते. विविध प्रसंगांना योग्य कथानकाची जोड देत महिलांचे कौतुक त्यांच्या पतींकडून व्यक्त करून घेण्यात आले. या रंजक सादरीकरणामुळे ज्येष्ठ नागरिकांसह उपस्थित प्रेक्षक कधी हसले, तर कधी भावुक होऊन डोळ्यात अश्रू आणत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते.

International Womens Day 
 
कार्यक्रमात गीता व अशोक कातुरे, माधवी व माधव पंचभाई, अनिल व अंजली कमाने, संजय व स्नेहल केळापुरे, सतीश व माधुरी कोटपल्लीवार, प्रशांत व अनिता पांडे, अरुण व अबोली फाळके, केशव व विमल चिमुरकर, मधुकर व मीना देशमुख आणि विश्वनाथ बेले या जोडप्यांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. International Womens Day पार्श्वगायन मिलिंद भूत व अबोली फाळके यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंदा नाडगीर होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाच्या सुप्रसिद्ध विधिज्ञ स्मिता देशपांडे उपस्थित होत्या. यावेळी कर्तृत्ववान महिला वर्षा बच्चेवार, स्नेहल गुंडावार आणि सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर डॉ. आस्था फाळके यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
तसेच “मातृत्व व कर्तृत्व स्वामिनी तुला प्रणाम” या कार्यक्रमात नृत्य सादरीकरण करून द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या महिलांचेही मंडळातर्फे कौतुक करण्यात आले. International Womens Day  त्यांनी पुन्हा नृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. कार्यक्रमाची सुरुवात अबोली फाळके यांनी सादर केलेल्या मानव गीताने झाली. स्वागतगीत माधवी पंचभाई, अलका गुंडावार, अपर्णा शेंडे आणि शीला जोशी यांनी सादर केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन माधुरी कोटपल्लीवार (महिला प्रमुख) यांनी केले, तर आभार प्रदर्शन मीना देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
सौजन्य: अपर्णा कुलकर्णी, संपर्क मित्र