कोरची,
CEO directly गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरची तालुका मुख्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नवरगाव येथे मागील पाच वर्षांपासून विविध प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड करून परिसरातील शेतकर्यांसाठी आदर्श निर्माण करणारे नवरगाव येथील श्यामकुमार यादव यांच्या बांधावर गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी नुकतीच भेट देऊन श्यामकुमार यादव यांच्याशी चर्चा करून त्यांचे कौतुक सुद्धा केले.

जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे हे कोरची तालुक्याच्या दौर्यावर असताना नवरगाव येथील शेतीबद्दल त्यांना माहिती प्राप्त होताच त्यांनी थेट शेत गाठले व शेतकरी श्यामकुमार यादव यांनी लावलेल्या विविध प्रकारच्या भाजीपाल्यांबद्दल सविस्तर चर्चा केली. CEO directly श्यामकुमार यादव यांनी मागील पाच वर्षांपासून काकडी, दुधी, कोहळा, वालाच्या शेंगा, वांगे, कारले, मिरच्या, टमाटर, भेंडी, चवळी अशा विविध प्रकारच्या भाजीची लागवड केली असून सुरुवातीला अर्धा एकर पासून शेतीची सुरुवात करणार्या श्यामकुमारने आता आपल्या व परिवाराच्या सदस्याच्या मेहनतीने पावणेदोन एकर शेतामध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड केलेली आहे.
महत्त्वाचे म्हणजे या शेतीच्या उत्पादनामध्ये जवळपास 75 टक्के सेंद्रिय पद्धतीचा खत वापरण्यात येत आहे. यामागचे कारण म्हणजे शरीराला होणारी हानी व त्रास दूर करून जमिनीतील सुपीकता सुद्धा वाढवणे असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात ही शेती 100 टक्के सेंद्रिय पद्धतीने करण्याचा विचार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. विविध प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड करून सदर भाजीपाल्याची मागणी स्थानिक बाजारपेठेत असली तरी पाहिजे तसे दर मिळत नसून मोठ्या बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्री झाल्यास उत्पन्नामध्ये वाढ होईल. CEO directly तसेच कोरची तालुक्यात सतत विजेचा लपंडाव बघितला जात असून यामुळे सुद्धा उत्पन्न घेण्यास खूप अडचणीचा सामना करावा लागतो. सतत विजेच्या लपंडावामुळे पाहिजे तसे उत्पन्न मिळत नसल्याची खंत शेतकरी श्यामकुमार यादव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर व्यक्त केली.
यावेळी सदर शेतकर्याला कृषी विभागाच्या योजनेतून तातडीने सोलर मंजूर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. तसेच जनावरांनपासून संरक्षणाकरिता कुंपण तारेची सुद्धा शासकीय योजनेतून श्यामकुमार यादव यांनी मागणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकार्यांसोबत कार्यकारी अभियंता पाटील, CEO directly संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये, विस्तार अधिकारी (कृषी) देवानंद फुलझेले, डेव्हिड मसराम, ग्रामपंचायत अधिकारी पुराम आदी उपस्थित होते.