चंद्रपूरला ‘व्याघ्र जिल्हा’ घोषित करा

वाघांची संख्या 300 पार

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
चंद्रपूर,
Tiger District ‘स्टेटस ऑफ टायगर्स इन इंडिया 2022’ या अहवालानुसार, गेल्या व्याघ्र गणनेत चंद्रपूर जिल्ह्यात 249 वाघ नोंदवले गेले होते. वन विभागाच्या अधिकार्‍यांच्या मते, त्यानंतर ही संख्या वाढून 300 च्या पुढे गेली आहे. ज्यामुळे देशातील वाघ संवर्धनात या जिल्ह्याचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. त्यामुळे या जिल्ह्याला अधिकृतपणे ‘व्याघ्र जिल्हा’ घोषित करा, अशी पर्यावरण कार्यकर्ते बंडू धोतरे यांनी, आधीच केलेली मागणी पुन्हा एकदा पुढे आणली आहे.
 
 
Tiger District
 
जगात एका जिल्ह्यात सर्वाधिक वाघांची घनता असलेल्या चंद्रपूरसाठी स्वतंत्र प्रशासकीय चौकट उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे वाघांचे संरक्षण अधिक मजबूत होईल तसेच वाढत्या वाघ-मानव संघर्षावर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, असा त्यांचा युक्तिवाद आहे. Tiger District ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित लोहारडोंगरी लोह खाणीच्या विरोधात आंदोलन यशस्वी झाल्याच्या पृष्ठभूमीवर धोतरे यांनी ही मागणी केली. चंद्रपूर जिल्ह्यात झपाट्याने वाढणार्‍या वाघांच्या संख्येचा विचार करता वन-वन्यजीव व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये विखुरलेली व्यवस्था न ठेवता सर्व विभागांमध्ये समन्वय साधणारी एकत्रित प्रणाली आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
 
धोतरे यांनी ही मागणी दशकभरापूर्वी मांडली होती. जुलै 2012 मध्ये त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपूर समोर जिल्हातील प्रभावी व्याघ्र संवर्धनाच्या मागण्यासोबतच चंद्रपूरला ‘व्याघ्र जिल्हा’ घोषित करण्यासाठी नागपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य शासनाने या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी तीन मुख्य वनसंरक्षकांची समिती नेमली होती. Tiger District या समितीने तयार केलेले घोषणापत्र 3 एप्रिल 2013 रोजी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे पाठविले होते. त्यानंतर 1 जुलै 2013 रोजी हा प्रस्ताव राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी, वन विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात आला. मात्र, प्रशासकीय बदलांमुळे हा प्रस्ताव पुढे अंमलात येऊ शकला नाही.
 
एकट्या ताडोबा प्रकल्पात 95 वाघ
अधिकृत आकडेवारीनुसार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 95 वाघ, ब्रम्हपुरी वनविभागात 65, चंद्रपूर वनविभागात 52, तर सेंट्रल चांदा वनविभागात 36 वाघ आहेत. Tiger District परंतु, आता या संख्येत अधिक भर पडली आहे. ताडोबा वनक्षेत्र ही जंगल भ्रमणमार्ग पुढे पूर्व उत्तर दिशेकडे गडचिरोली, नवेगाव नागझिरा, तर उमरेड कर्हाड्ला अभयारण्य दक्षिणेकडे तेलंगणातील कावल व्याघ्र प्रकल्पाशी, इंद्रावती व्याघ्र प्रकल्पशी जोडली गेली असून त्यामुळे महत्त्वाचा आंतरराज्य वन्यजीव कॉरिडॉर तयार झाला आहे.
 
वाघांची संख्या 300 पार
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष लक्षात घेता, राज्य सरकारने 2020 मधे चंद्रपूर जिल्हा वाघ मानव संघर्ष तांत्रिक अभ्यास समिती गठीत केली होती. 2021 मध्ये या समितीचा अहवाल प्राप्त झाला, तो शासनाद्वारे स्वीकारला गेला. त्याची अंमलबजावणी बाबत राज्य वन्यजीव सल्लगार मंडळाच्या बैठकीत शिफारस करण्यात आले. Tiger Districtमात्र, 5 वर्षाचा कालवधी लोटूनसुध्दा अंमलबजावणी नाही. 2021 ते 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात 200 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती धोतरे यांनी दिली.