वर्धा
Wardha वर्धा शहरात फत माध्यमांवरच घरगुती वापराच्या सिलेंडरचा तुटवडा आहे. नियमानुसार घरगुती वापराचे सिलेंडर घरपोच पोहोचवले जात आहे. दरम्यान, सिलेंडरच्या शॉर्टेजच्या ओरडचा फायदा घेत महादेवपुर्यात तब्बल १८०० रुपयांत घरगुती वापराचे सिलेंडर विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे.
Wardha वर्धा शहरात मागणीनुसार घरगुती वापराच्या सिलेंडरचा पुरवठा सुरू आहे. नियमानुसार सिलेंडर पोहाचवल्या जात आहेत. परंतु, ग्राहकांमध्ये आक्रोश निर्माण झाल्याने गॅस सिलेंडर विक्रीच्या दुकानांपुढे लांबच लांब रांगा लागून आहेत. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा मात्र बंद असल्याची माहिती इब्राहीमजी आदमजी गॅस एजन्सीचे संचालक आसिफ जावेद यांनी दिली.
दरम्यान, ग्राहकांच्या मागणीचा फायदा घेत महादेवपुर्यातील गॅस शेगडी, मिसर दुरुस्तीच्या दुकानातून चढ्या भावात म्हणजे तब्बल १८०० रुपयांना सिलेंडर विकल्या जात असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली. या दुकानातून ५ किलो गॅसचे छोटे सिलेंडर नियमित विकल्या जातात. आता या परिस्थितीचा गैरफायदा घेत सिलेंडर काळा बाजार सुरू केल्याचे सांगण्यात आले. मात्र, महादेवपुर्यातील त्या दुकानात घरगुती वापराचे सिलेंडर कुठून येतात याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कॅटरिेंगवाल्यांकडे पुरेसा साठा
Wardha व्यावसायिक सिलेंडरच्या विक्रीवर बंदी आल्यानंतर कॅटरिंगवाल्याचे काय अशी एकच बोंब उडाली होती. परंतु, शहरातील लग्न कार्य नियमित सुरू आहेत. शहरातील अनेक कॅटरिंग व्यावसायिकांकडे पुढील ८ दिवस पुरेल असा व्यावसायिक सिलेंडरचा साठा असल्याचे सांगण्यात येते.