वर्धा,
Samruddhi Highway मुंबईच्या दिशेने जाणार्या एका ट्रकला मागून गोवंश वाहतूक करणार्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात धडक देणार्या ट्रकचा चालक व ट्रकमधील ९ बैलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार १४ रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील धानोली-मेघे परिसरात चेन क्रमांक ४३.९०० येथे घडली. दिनेश दादाराव गव्हाणे (२९) रा. मंगलधाम, जि. वाशिम असे मृतकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर. जे. ०२ जी. बी. ६३३ क्रमांकाचा ट्रक हा दुसर्या लेनने मुंबईच्या दिशेने जात होता. त्याच्या मागून एम. एच. ३७ टी. ४५८७ क्रमांकाचा ट्रक येत होता. मागील ट्रकचा चालक वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याने त्याने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, समोरील ट्रकचे टायर फुटले तसेच मागील बाजूचा लोखंडी गार्ड तुटला. धडक देणार्या ट्रकच्या कॅबिनचा पूर्णत: चुराडा झाला. Samruddhi Highway या भीषण अपघातात चालक अडकून गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाची रेस्यू टीम घटनास्थळी पोहोचली. सेलू पोलिसांनीही घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जखमी दिनेश गव्हाणे याला तात्काळ सेलू ग्रामीण रुग्णालयात हलविले; मात्र डॉटरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये १२ बैल आढळून आले. त्यापैकी ९ बैलांचा अपघातात मृत्यू झाला, तर ३ बैल किरकोळ जखमी झाले. Samruddhi Highway संबंधित ट्रक गोवंश वाहतुकीसाठी तयार करण्यात आला होता. त्यामध्ये लोखंडी पाइपचे कठडे, पिण्याच्या पाण्याची टाकी, चारा आणि खाली रबरची मॅट लावलेली होती. अपघातानंतर समोरील ट्रकचा चालक घटनास्थळी आढळला नाही. या प्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे