नागपूर,
Hawrapeth रविवार दि.१५ मार्च २०२६ ला सकल हिंदू समाज द्वारा आयोजित हिंदू सम्मेलनाचे भव्य आयोजन श्री गणपती हनुमान मंदिर परिसर हावरापेठ येथे आयोजित करण्यात आले आहे.
दि. १५ मार्च ला पहाटे ६ वा.ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येणार, सकाळी ७ ते ८ रांगोळी स्पर्धा, सकाळी ८ ते १० प्रभात फेरी मध्ये लहान लहान मुले मुली महापुरुषांच्या- पर्यावरणाच्या वेशभूषेत सहभाग घेतील, दुपारी १२ ते २ चित्रकला स्पर्धा सायंकाळी ५ ते ८ कार्यक्रमांमध्ये कलश स्थापना, Hawrapeth श्री गणेश पूजन, गौमाता पुजन व दिप प्रज्वलन -सुप्रसिध्द लेखक अमोल पुसदकर, सामाजिक कार्यकर्त्या- निता भागवतकर, वेदमूर्ती- संजय शास्त्री करकरे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. संपूर्ण हिंदू समाज, सज्जन शक्ती, मातृशक्ति आणि युवक शक्ती यांनी हिंदू समाजाच्या जागृती साठी निश्चित वेळेत सम्मेलन स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाज नागपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र