६० कोटींच्या बंधार्‍यातून हिंगणघाटचा पाणीप्रश्न सुटणार

वेणा नदीवरील प्रस्तावित बंधारा कामाची आ. कुणावारांकडून पाहणी

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
हिंगणघाट,
Hinganghats water problem येथील नागरिकांना भविष्यात मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा, तसेच शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने वेणा नदीवर बंधार्‍याचे काम प्रस्तावित आहे. दरम्यान, राज्य सरकारने या बंधार्‍यासाठी ६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून या प्रस्तावित बंधारा कामाची आ. समीर कुणावार यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. हा बंधारा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून बंधारा अस्तित्वात आल्यानंतर हिंगणघाटकरांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
 
 
Hinganghats water problem
 
वेणा नदीवरील प्रस्तावित बंधार्‍याच्या कामाची पाहणी करण्यासाठी शनिवार १४ रोजी आ. कुणावार यांनी संबंधित अधिकारी तसेच नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांच्यासह नियोजित बंधारास्थळी भेट दिली. यावेळी नियोजित बंधार्‍याच्या कामाविषयी सविस्तर आढावा घेण्यात आला. Hinganghats water problem राज्य शासनाकडून सुमारे ६० कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत या बंधार्‍याचे काम मंजूर करण्यात आले असून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या मंजुरीकरिता आ. कुणावार यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यानेच हा बंधारा लवकरच पूर्णत्वास येणार आहे.
 
 
या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या काळात हिंगणघाट शहराला चोवीस तास मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचा आ. कुणावार यचा उद्देश असून शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरणार आहे. यावेळी अधिकार्‍यांना कामाची गुणवत्ता कायम राखत Hinganghats water problem नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. बंधार्‍याचे काम तातडीने आणि प्रभावीपणे पूर्ण होऊन त्याचा लाभ नागरिकांना लवकरात लवकर मिळावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कारवाई करावी, असे आवाहनही आ. कुणावार यांनी अधिकार्‍यांना केले.
 
 
सदर बंधारा पाहणी दरम्यान नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर, उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, प्रा. उमेश तुळसकर, पाणीपुरवठा सभापती रवीला आखाडे, Hinganghats water problem नगरसेवक बंटी वाघमारे, बांधकाम सभापती चंदू माळवे, गटनेता भूषण पिसे, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, तहसीलदार योगेश शिंदे, नप मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, पाटबंधारे विभागाच्या अभियंता प्रांजली टोंगसे, उपविभागीय अभियंता घुमडे, नपचे पाणीपुरवठा अभियंता रोशन कुमरे, आदी उपस्थित होते.