CBSEत कॉपी करताना पकडले गेल्यास कंपार्टमेंट परीक्षा द्यावी लागेल

10वी, 12वीसाठी नवीन नियम लागू

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली  
CBSE म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन बोर्ड आता विद्यार्थ्यांना सहाव्या किंवा सातव्या अतिरिक्त विषयाच्या आधारावर पास करणार नाही. बोर्डाने 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.
  
cbse
 
CBSE हे नियम विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत, ज्यांना परीक्षेदरम्यान कॉपी किंवा कोणत्याही गैरवर्तनामुळे बाहेर काढण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट परीक्षा द्यावी लागेल.
उइडए च्या नवीन नियमांनुसार, आता विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी त्यांच्या मुख्य विषयातच निर्धारित गुण मिळवावे लागतील. जर एखाद्या विद्यार्थ्याचा कोणत्याही विषयाचा निकाल गैरमार्गांचा वापर केल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे रोखला गेला, तर त्याला अतिरिक्त विषयाच्या गुणांच्या आधारावर पास मानले जाणार नाही.
 
 
अतिरिक्त विषयांच्या मदतीने विद्यार्थी पास होत होते
CBSE बोर्डाच्या जुन्या नियमांनुसार, जर एखाद्या विद्यार्थ्याला मुख्य विषयात किमान गुण मिळाले नसतील, परंतु त्याने अतिरिक्त विषयात चांगले गुण मिळवले असतील, तर त्या विषयाच्या आधारावर त्याला उत्तीर्ण केले जाऊ शकत होते. आता बोर्डाने ही व्यवस्था रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
बोर्डानुसार, काही प्रकरणांमध्ये विद्यार्थी अतिरिक्त विषयांच्या मदतीने उत्तीर्ण होत होते, ज्यामुळे परीक्षा प्रणालीच्या निष्पक्षतेवर परिणाम होत होता. म्हणून बोर्डाने मूल्यांकन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कठोर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
अतिरिक्त विषय केवळ कौशल्य आणि ज्ञानासाठी
CBSEया बदलानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्य विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. या नियमानंतर अतिरिक्त विषय आता केवळ तुमच्या कौशल्य आणि ज्ञानासाठी असतील. गुण वाढवण्यात त्यांची भूमिका नसेल.