मानोरा,
electric poles तालुक्यातील बेलोरा येथील खोराडी नदी काठची पुरसंरक्षण भिंतीचे काम झाले असून, त्या ठिकाणी भिंतीवरून विजेचे तार गेले आहेत. त्यामुळे सदर कमी उंचीचे विद्युत खांब बदलून नवीन बसविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सद्यस्थितीत बेलोरा या गावात नदी काठावर असलेल्या श्री कृपागीर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भागवत सप्ताह सुरु असून, या ठिकाणी भाविकांची गर्दी उसळत आहे. त्यामुळे या ठिकाणी कमी उंचीच्या विद्युत खांबामुळे धोका निर्माण होऊन नागरिकांची जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे महावितरणने याची दखल घेऊन नवीन खांप टाकून उंची वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
३ महिन्याआधी नवीन विद्युत खांब बसविण्याबाबत वारंवार कळविले आहे. परंतु, महावितरणने याबाबत दखल घेतली नाही. येत्या ८ दिवसात न्याय द्यावा, electric poles अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कृपागीर महाराज संस्थांनाचे अध्यक्ष दामोदर भोयर, सामाजिक कार्यकर्ते विशाल ठाकरे आदीसह ग्रामस्थांनी दिला आहे.