नागपूर,
International conference गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर येथे १७ ते १८ मार्च २०२६ दरम्यान “विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील अलिकडच्या ट्रेंड्स” (ICRTSET-2026) या विषयावर सहावी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येत आहे. ही परिषद IQAC आणि IIC यांच्या सहकार्याने तसेच AICTE आणि ISTE मान्यतेसह हायब्रिड पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत परिसंवाद, प्रमुख भाषणे आणि २०० हून अधिक शोधनिबंधांचे सादरीकरण होणार आहे. परिषदेत ३०० हून अधिक प्रतिनिधी, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी होणार असून विविध राज्ये तसेच परदेशातील तज्ज्ञ, पॅनेल सदस्य आणि सादरकर्तेही उपस्थित राहणार आहेत.

आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सचिन उंटावले (संचालक, GHRCEM, नागपूर) उपस्थित राहतील. International conference तसेच डॉ. विजय एम. वाढाई (प्राचार्य, SVPCET, नागपूर) आणि लुईस स्टोनियर (तांत्रिक अभियंता, Deskpro, लंडन) हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेचे चेअरमन डॉ. सलीम चव्हाण (प्राचार्य, GWCET), सह-अध्यक्ष डॉ. राकेश श्रीवास्तव (उपप्राचार्य, GWCET), संयोजक डॉ. प्रीती एन. भगत (प्रमुख, ETC व संशोधन व विकास समन्वयक) तसेच सह-संयोजक प्रा. समीर आष्टेकर यांनी सांगितले की, ही दोन दिवसीय परिषद विज्ञान, व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या संकल्पना आणि संशोधनाला चालना देणारी ठरेल. International conference दरम्यान, अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, मंडळाचे सचिव व आमदार अॅड. अभिजित वंजारी तसेच डॉ. स्मिता वंजारी यांनी परिषदेसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत.
सौजन्य: मनोज वैराळकर, संपर्क मित्र