मी तिचा गळा दाबला...आणि आरोपी पोहोचला नाशकात

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
नाशिक,
Kalyan Murder Case कल्याणमधील उंबर्डे परिसरात एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विशाल भुतकर आणि अर्चना भुतकर या जोडप्याचे गेल्या काही महिन्यांपासून वैयक्तिक वाद सुरू होते. विशालला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, ज्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. घटनेच्या दिवशी विशाल कल्याणमधील उंबर्डे येथील घरात गेला, जिथे जोरदार वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने अर्चनाचा गळा दाबून खून केला. हत्या केल्यानंतर विशाल थेट नाशिकमधील त्याच्या भावाकडे गेला आणि सर्व घटनेची माहिती दिली.
 
Kalyan Murder Case
 
विशालच्या भावाच्या मार्गदर्शनाखाली, विशाल नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात पोहोचला आणि आपली कबुली दिली. सुरुवातीला पोलिसांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, परंतु नाशिक पोलिसांनी तातडीने कल्याणमधील खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला. Kalyan Murder Case खडकपाडा पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि घरात प्रवेश करताच अर्चना भुतकरचा मृतदेह आढळला. पोलिसांनी विशालला ताब्यात घेतले असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे. विशाल आणि अर्चनाला दोन मुले आहेत; एक मुलगा विशालसोबत राहत असून दुसरा मुलगा अर्चनाच्या आईसोबत राहतो.