केडीके कॉलेजमध्ये “हॅकाथॉनिक्स 2.0” स्पर्धा उत्साहात

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
नागपूर,
K.D.K. College के.डी.के. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या कोडिंग क्लबतर्फे “हॅकाथॉनिक्स 2.0” या १२ तासांच्या नाविन्यपूर्ण तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत २० पेक्षा अधिक महाविद्यालयांतील २७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध संघांनी वेब विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, ब्लॉकचेन, फिनटेक व इंटरनेट ऑफ थिंग्स या क्षेत्रांमध्ये प्रकल्प सादर केले.

kd 
 
 
स्पर्धेत जीएचआरसीई नागपूरच्या टीम माइनगार्ड्सने प्रथम, जेडीसीईएम नागपूरच्या टीम इव्होने द्वितीय, तर एसव्हीपीसीईटी नागपूरच्या टीम इनोव्हेटर्सने तृतीय क्रमांक पटकावला. K.D.K. College कार्यक्रम प्राचार्य डॉ. व्ही. पी. वर्गीस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. उपप्राचार्य डॉ. ए. एम. बदर, विभागप्रमुख डॉ. ए. ए. जैस्वाल व प्रा. ए. एम. कुठे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशासाठी कोडिंग क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:तेजेंद्र गिरडे,संपर्क मित्र