मानोरा,
Varoli road मानोरा हे तालुक्याचे शहर अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे चौपदरी सिमेंट महामार्ग झाला असून, मानोरा ते कारंजा तथा कुपटा मार्गे मंगरूळनाथ हा सुद्धा रुंद डांबरी महामार्ग तयार झाला आहे. या महामार्गांना जोडणार्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था मात्र, पार कोलमोडलेली असल्याचे सेवादास नगर, वरोली, कारखेडा विठोली सह अनेक खिळखिळ्या झालेल्या या रस्त्यांनी येजा करणार्या नागरिकांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.
सेवादास नगर वरोली ते कारखेडा हा रस्ता पूर्णपणे खड्डमय झाला असून, या उघडखाबड कच्च्या रस्त्यांवरून दुचाकी, तीन चाकी अथवा कुठल्याही वाहनाने ये जा करणार्या असंख्य नागरिकांना मणक्यांच्या आजाराने ग्रासले आहे. उपरोक्त गावातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना मानोरा शहरातील संत सेवालाल महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह पदवीचे शिक्षण घेण्यासाठी रस्त्याने येजा करावे लागते. Varoli road विद्यार्थ्यांसह आजारी महिला वयोवृद्ध नागरिकांना सुद्धा उपरोक्त खड्डेमय रस्त्याने यावे लागत असल्याने आजार अधिकच बळावत असल्याची वास्तविकता आहे.
गत अनेक वर्षांपूर्वी पासून उपरोक्त खड्डेमय व कच्च्या रस्त्याने ये जा करावी लागत असल्याने सेवादास नगर आणि वरोली मधील असंख्य नागरिकांना अवजड जागेचे दुखणे झाले असल्याची माहिती एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याची अटीवर दिली. Varoli road या रस्त्याची पारदर्शकपणे डागडुजी व डांबरीकरण होत नसल्यामुळे आम्हाला अवघड जागेच्या दुखण्यासह मानसिक व आर्थिक कुचंबना सुद्धा सोसत जगावे लागत असल्याची व्यथा व आगतिकता प्रस्तुत प्रतिनिधीकडे त्याने मांडली.