तेहरान,
Photos of coffins of martyred sailors इराण सरकारनेआयआरआयएस देना फ्रिगेटवरील अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या खलाशांच्या शवपेट्यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. भारतातील इराणच्या दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले, आयआरआयएस देना फ्रिगेटवर अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या नौदल शहीदांचे पवित्र आणि नश्वर अवशेष.इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बकाई यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या खलाशांना श्रद्धांजली वाहिली आणि या हल्ल्याला युद्ध गुन्हा व आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले. त्यांनी सांगितले की इराणी जनता हे कधीही विसरणार नाही.
बकाई यांनी म्हटले, आम्ही ४ मार्च रोजी त्यांच्या मातृभूमीपासून दूर शहीद झालेल्या देना फ्रिगेटच्या खलाशांना श्रद्धांजली वाहतो. भारतीय नौदलाने संयुक्त नौदल सराव आणि बंदर भेटीसाठी देनाला अधिकृतपणे आमंत्रित केले होते. त्याचबरोबर, अमेरिकेने जानबुजून खलाशांच्या बचाव कार्यात अडथळा आणल्याचेही त्यांनी नमूद केले. ही घटना संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ठरावांतर्गत आक्रमकतेचे आणि युद्ध कायद्यांचे गंभीर उल्लंघन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
४ मार्च रोजी श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावर गॅलेच्या पश्चिमेला सुमारे ३७ किलोमीटर अंतरावर अमेरिकन पाणबुडीने टॉर्पेडोने आयआरआयएस देना युद्धनौका बुडवली. या जहाजावर सुमारे १८० खलाशी होते. हल्ल्यात ८७ खलाशांचा मृत्यू झाला, तर ३२ खलाशांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवून गॅलेमधील रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर भारतीय नौदलाने त्वरित प्रतिसाद दिला. आयएनएस तरंगिनी, आयएनएस इक्षक जहाजे आणि पी-८आय सागरी गस्त विमान तैनात करून श्रीलंकेच्या नेतृत्वाखाली शोध व बचाव कार्य सुरु केले. इराणी जनता या घृणास्पद हल्ल्याला विसरणार नाही आणि माफही करणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.