पिपरीघाटात वाळू तस्करी : दोन तस्करांवर कारवाई

पिपरीघाटात वाळू तस्करी : दोन तस्करांवर कारवाई

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
सडक अर्जुनी,
piprighat sand smuggling सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असून रात्रीच्या वेळी रेती तस्कर सक्रिय होऊन मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करीत आहेत त्यापैकी तालुक्यातील पिपरी घाट परिसरातून वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक करणार्‍या दोन वाळू तस्करांवर स्थानिक तहसीलदारांच्या पथकाने कारवाई करून दोघांच्या ताब्यातील ट्रॅक्टर जप्त केले आहे. ही कारवाई १३ मार्च रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
 

piprighat sand smuggling  
महसूल विभागाचे पथक गस्तीवर असताना आरोपी हिवराज रामदास लोथे व सुहास जसवंत चांदेवार दोघेही राहणार गोंडउमरी ता. साकोली जि. भंडारा हे ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ ए एल ५४५६ व ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ ए एल ५९६२ मध्ये दोन ब्रास वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक piprighat sand smuggling  करताना मिळून आले. दरम्यान, महसूल विभागाच्या पथकाने दोन्ही ट्रॅक्टर थांबवून दोघांवरही महसूल नियमानुसार कारवाई करून दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. सदरची कारवाई तहसीलदार अनंत जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून या कारवाईमुळे परिसरातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.