नागपूर,
Mannatheshwar नरखेड–काटोल मतदारसंघातील तीर्थक्षेत्र मन्नाथेश्वर, घोगरा येथे विकासकामांसाठी आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या पुढाकाराने वनविभागाची बैठक घेण्यात आली. ग्रामपंचायत घोगरा यांनी केलेल्या मागणीनुसार या ठिकाणी वनपर्यटनाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला.
यासोबतच कोलबर्डी, केदारपूर, जांबुलधरा आणि जामगड या ठिकाणांसाठीही विकासात्मक प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. Mannatheshwar या पुढाकाराबद्दल गट ग्रामपंचायत घोगरा, लोहारा आणि जुनेवाणी यांच्या वतीने आमदार चरणसिंग ठाकूर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सौजन्य: महादेव तायवाडे, संपर्क मित्र