राज्यातील सहायक निरीक्षक व पाेलिस नाईक पदांना नवसंजिवनी

- गृहमंत्रालयाने जारी केला आदेश

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
posts of assistant inspector राज्य पाेलिस दलात आश्वासित प्रगती याेजना लागून झाल्यानंतर सहायक पाेलिस निरीक्षक आणि नाईक पाेलिस शिपाई ही दाेन पदे व्यपगत करण्यात आली हाेती. मात्र, पाेलिस शिपायांच्या एकूण मंजूर पदांपैकी 15 हजार पदांची श्रेणीवाढ करुन पाेलिस नाईक ही पदे निर्माण करण्याचा तसेच पाेलिस उपनिरीक्षकांच्या एकूण मंजूर पदांपैकी 1500 पदांची श्रेणीवाढ करुन सहाय्यक पाेलिस निरीक्षक ही पदे निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला हाेता. गृह मंत्रालयाने या दाेन्ही पदांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढीस मंजुरी दिली आहे.
 

posts of assistant inspector  
 
राज्य पाेलिस दलात पदाेन्नतीच्या टप्प्यात वाढ व्हावी आणि पाेलिस अधिकारी आणि कर्मचाèयांचे कल्याण साधण्याच्या उद्देशाने सहायक पाेलिस निरीक्षक (एपीआय) आणि नाईक पाेलिस शिपाई (एनपीसी) ही दाेन्ही पदे व्यपगत करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला हाेता. तसेच राज्यातील पाेलिस कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती याेजना (10वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे) लागू करण्यात आली हाेती. या याेजनेअंतर्गत पाेेलिस शिपाई पदावर नाेकरीवर लागल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पहिल्या दहा वर्षांच्या सेेवेनंतर थेट पाेलिस हवालदार पदावर पदाेन्नती देण्यात येणार हाेती. तसेच 20 वर्षांच्या सेवेनंतर थेट सहायक पाेलिस उपनिरीक्षक पदावर तर 30 वर्षांच्या सेवेनंतर थेट पाेलिस उपनिरीक्षक या अधिकारी दर्जाच्या पदावर पदाेन्नती देण्यात येणार हाेती. आश्वासित प्रगती याेजनेमुळे प्रत्येक पाेलिस शिपायाला पाेलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकारी हाेण्याची संधी निर्माण झाली आहे. तसेच पाेलिस उपनिरीक्षकांना जवळपास 10 ते 12 वर्षे सेवा दिल्यानंतर सहायक पाेलिस निरीक्षक या पदावर पदाेन्नती दिल्या जाते. मात्र, एपीआय हे पद व्यपगत करण्यात आले हाेते. त्यामुळे पीएसआय पदावरुन थेट पाेलिस निरीक्षक पदावर पदाेन्नती देण्यास मंजुरी देण्यात आली हाेती. मात्र, गृहमंत्रालयाने सहायक निरीक्षक आणि पाेलिस नाईक या दाेन्ही पदांना मुदतवाढ दिली आहे.
31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
सहायक पाेलिस निरीक्षक (1500 पदे) आणि पाेलिस नाईक शिपाई (15 हजार पदे) ही दाेन्ही पदे येत्या 31 ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यरत राहतील. त्यामुळे सध्या दाेन्ही पदावर कार्यरत पाेलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदाेन्नतीच्या कक्षेची 31 ऑगस्टपर्यंत वाट बघावी लागणार आहे.posts of assistant inspector पाेलिस नाईक संवर्गातील अंमलदार यांना पाेलिस हवालदार पदावर पदाेन्नती दिल्यानंतर पाेलिस नाईक संवर्गातील जेवढी पदे रिक्त हाेतील तेवढी पदे व्यपगत करण्यात यावीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.