सावलखेड्याने शंकरपटाची परंपरा जोपासली: कृष्णा गजबे

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
कडोली,
Krishna Gajbe बारा महिने मातीत खपणार्‍या शेतकर्‍यांसाठी रब्बीच्या पिकानंतर हे महिने म्हणजे आनंदाची पर्वणी असते. या काळात झाडीपट्टीत पट, नाटकाचा मौसम असते. पूर्वी झाडीपट्टीत आठ दिवसाच्या शंकरपटाची रनधुमाळी चालायची. आता तो उत्साह ओसरला असला तरी कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा या गावाने शंकरपटाची परंपरा जोपासली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
 
 
Krishna Gajbe
 
कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा येथे दहा दिवसाच्या शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. शंकरपटाच्या पहिल्या दिवशी मनोरंजनाकरिता नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिप उपाध्यक्ष जीवन नाट यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला माजी जिप सदस्य पी. आर. आकरे, तालुका भाजपाध्यक्ष चांगदेव फाये, Krishna Gajbe  माजी जिप सदस्य भाग्यवान टेकाम, वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव नारनवरे, विजय नाकाडे, चंद्रकांत चौके, जयंत निंबेकार, सेवाकर सहारे, प्रा. प्रदीप बोडणे, गुणवंत दडमल, पोलिस उपनिरीक्षक दिवाकर हलामी, काशिनाथ डोनाडकर, दौलत धोटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कीर्तीलाल दडमल यांनी केले. प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी निंदेकर तर आभारप्रदर्शन भास्कर दडमल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव नाट्य कला मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सहकार्य केले.