कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यस्तरीय मेळावा

अ‍ॅड. सुनील डोंगरे यांची पत्रपरिषदेत माहिती

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
वर्धा,
State-level gathering कांशिराम यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन रविवार १५ रोजी साटोणे ले-आउटचे मैदान, सावंगी टी-पॉइंट येथे करण्यात आले असल्याची माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. सुनील डोंगरे यांनी आज १४ रोजी पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 
 
State-level gathering
 
मेळाव्यात आरोग्य तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयी मार्गदर्शन, शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या समाजसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. State-level gathering याशिवाय विकास राजा आणि संच प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती अ‍ॅड. डोंगरे यांनी दिली. अध्यक्षस्थानी बसपचे महाराष्ट्र केंद्रीय प्रभारी तथा खासदार रामजी गौतम असतील. प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. सुनील डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मुकुंद सोनवणे, प्रदेश महासचिव डॉ. मोहन राईकवार, मंगेश ठाकरे, पृथ्वी शेंडे, दादाराव उईके, नागोराव जयकर, जानराव ठोंबरे, बसपच्या प्रदेश संघटिका डॉ. विद्या राईकवार, मोहसीन खान, एल. एस. तुस्कर, स्कर्मिश खडसे आदी प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत. पत्रकार परिषदेला बसपचे प्रदेश महासचिव डॉ. मोहन राईकवार, डॉ. विद्या राईकवार, जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे उपस्थित होते.