मोझरी (शेकापूर),
Wardha News ग्रामीण भाग आजही राज्य परिवहन मंडळाच्या बसेसच्या जाळ्याने जोडल्या गेला आहे. गाव राज्य परिवहन मंडळाच्या बसची घंटोंघंटे वाट पाहत असते. गावातील प्रवाशांच्या भारोश्यावर महामंडळाचा डोलारा उभा असताना वर्धेहून निघालेली बस साती येथे पोहोचलीच नाही. कानगाव येथे प्रवाशांना उतरवत बस माघारी निघाल्याने प्रवाशांना ४ तास उन्हात ताटकळत बसावे लागले. विशेष म्हणजे आपल्याला कोर्टाचे काम असल्याचेही बस चालकाने सांगितल्याचे बसमधील प्रवाशांनी सांगितले.

वर्धा-साती (वरुड) ही एम एच ४०/वाय-५५३२ क्रमांकाची बस प्रवाशी घेऊन निघाली. मात्र, दुपारी १२ वाजताची बस सातीला न जाता कानगाव वरूनच परतली. त्यामुळे वृद्ध प्रवाशांसह विद्यार्थ्यांना चार तास कानगावातच राहावे लागले. बसस्थानक प्रमुखांशी नाराज विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. Wardha News पण, नियंत्रकाने भ्रमणध्वनी उचलला नाही. तीन आठवड्यापासून साती ही बस फेरी नियमित येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दररोज दुपारी साडेबारा वाजता मोझरीत येणारी वर्धा ते साती बस फेरी गत आठवड्यापासून फेल झाली या नावाखाली येतच नव्हती.
आज शनिवार असल्याने सकाळी सहा वाजताच्या बसने मोझरी, खानगाव, साती, वरुड आदी गावातील विद्यार्थी कानगाव, सरुळ, वायगाव, वर्धा येथे शाळा महाविद्यालयात पोहोचले. मात्र, सदर बस आली. मात्र, ती बस फेरी कानगावपर्यंतच आली लागलीच परत गेली. बस येताच आनंदलेले प्रवाशी आणि विद्यार्थी बस जवळ गेले. परंतु, बसचालक आणि वाहकाने ही बस साती, मोझरी येथे जाणार नसल्याचे सांगितले. Wardha News प्रवाशांनी विचारणा केली असता कोर्टाचे काम आहे असे चालकाने सांगितले. वाहकांने बसमधील प्रवाशांना खाली उतरून दिले. परिणामी, एसटीची सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी आहे की, लहरी चालकाच्या मौजमजेसाठी आहे, असा सवाल विचारला जात आहे? या अनाकलनीय प्रकारामुळे हिरमुसलेले प्रवाशी तब्बल चार तास कानगावात ताटकळत, उपाशी आणि पाण्यावाचून उभे होते. बस फेरीची तक्रार करण्यासाठी अधिकार्यांना भ्रमणध्वनीवरून अनेकदा संपर्क केला. पण, प्रतिसाद मिळात नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.