नागपूर,
Aasman Foundation विदर्भातील सामाजिक कार्यात अग्रणी संस्था आसमान फाऊंडेशन आणि आसमान महिला को-ऑप क्रेडिट सोसायटी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमात समाजातील दिव्यांग, अंध, अपंग, मतिमंद, मूकबधीर आणि कर्णबधीर महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते होप फॉर होपलेसच्या संचालिका व दिव्यांगांसाठी कार्यरत समाजसेवी डॉ. रुची जैन, तसेच संगीत विशारद समाजसेवी विशाखा पाध्ये. Aasman Foundation संस्थेच्या नेतृत्वात डॉ. रवि गि-हे (अध्यक्ष, आसमान फाऊंडेशन), नरेश शेंडे (सचिव), मेघा गि-हे (अध्यक्ष, महिला सोसायटी), दिनेश टेकाडे, पूजा शेंडे व पायल काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विभा विंचुरकर यांनी केले, आभार प्रदर्शन डॉ. साधना थोते यांनी केले, तर स्वागत गीत सौ. मधुरा कोलारकर यांनी सादर केले.
कार्यक्रमात समाजातील अनेक कर्तबगार व होतकरू दिव्यांग मुली व महिला सन्मानित झाल्या. यामध्ये सुप्रसिद्ध अधिवक्ता नंदिता रविंद्र त्रिपाठी, शास्त्रीय संगीत विशारद व दूरदर्शनवर कार्यरत पूजा मिलमिले, पॉवरलिफ्टिंगमध्ये पुरस्कार मिळवणारी सुहा सोनूले, आर्ट, क्राफ्ट, पेंटिंग व डान्समध्ये उत्कृष्ट कार्य करणारी राधा देशपांडे, कर्णबधीर असूनही आर्ट, क्राफ्टसह ब्यूटी पार्लर चालवणारी भाग्यश्री तितरमारे, कर्णबधीर कामकाजी रुखमा भोयर, सहायक कला शिक्षक दिपाली गोखे व शिक्षणासाठी जिद्दीने वृध्द होतं वर्षा भलावी यांचा समावेश होता. सर्व सन्मानित महिलांना स्मृतीचिन्हे व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. Aasman Foundation डॉ. रवि गि-हे यांनी संस्थेतर्फे अनेक वर्षांपासून निराधार, गरीब, वंचित, दिव्यांग आणि आदिवासी मुली व महिलांसाठी चालवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच त्यांनी सांगितले की, लवकरच संस्थेतर्फे गरीब व वृद्धांसाठी वरिष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन वृध्दाश्रम सुरू करण्याची योजना आहे.
सौजन्य: दिनेश टेकाडे, संपर्क मित्र