वाशीम,
electricity bill वाशीममधील गोंदश्वर परिसरात थकीत वीज देयक वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका ग्राहकाने चक्क सहाय्यक अभियंत्याला लाकडी काठीने मारहाण केल्याची खळबळजनक घटना शनिवारी १४ मार्च रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक अभियंता मोबीन बशीर शेख हे आपल्या पथकासह थकीत वीज देयक वसुलीची मोहीम राबवत होते. electricity bill गोंदेश्वर येथील एका ग्राहकाचे मीटर काढत असतानाच प्रविण मडके नामक तरुण तिथे आला आणि वादाची ठिणगी पडली. वापरायला वीज नाही आणि बिलात सवलत नाही, मग सक्तीची वसुली कशासाठी? असा सवाल करत मडके याने पथकाशी दोन हात केले. शाब्दिक चकमकीनंतर संतापाचा पारा चढलेल्या मडके याने लाकडी काठीने अभियंता शेख यांच्यावर हल्ला चढवला, ज्यामध्ये शेख यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
वरिष्ठांकडून मिळालेल्या वसुलीच्या टार्गेटमुळे अधिकारी ग्राहकांना वेठीस धरत असून, याच प्रशासकीय मुजोरीतून अशा हिंसक घटना घडत आहेत. याप्रकरणी वाशीम शहर पोलिस ठाण्यात आरोपी प्रविण मडके याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १२१, ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक देविदास झूंजे करत आहेत. electricity bill कायदा हातात घेणे चुकीचे असले, तरी महावितरणने आपल्या धोरणात सुधारणा करून ग्राहकांना सन्मानाची वागणूक न दिल्यास येत्या काळात प्रशासनाला जबर शॉक बसण्याची शयता नाकारता येत नाही.