मुंबई,
baramati-assembly-by-election-date केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या पोटनिवडणुकांचीही घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या विधानसभेच्या जागांसाठी मतदान २३ एप्रिल रोजी होणार असून ४ मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

या निवडणुकांसाठी अधिकृत अधिसूचना ३० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर ७ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर ९ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे. बारामती मतदारसंघात ही पोटनिवडणूक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे होत आहे. baramati-assembly-by-election-date २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे भाजता आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे ऑक्टोबर २०२५ मध्ये आजाराने निधन झाले होते. या दोन्ही जागा रिक्त झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
दरम्यान, बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांतील निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी दिवसांत प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर या पोटनिवडणुकांची राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.