सिने अभिनेता संदीप पाठक पोहचार थेट गावात

- मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान - जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीत साधणार संवाद

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
गोंदिया, 
sandeep-pathak : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत सुप्रसिध्द सिने अभिनेता संदीप पाठक (वर्‍हाड निघालं लंडनला फेम) मंगळवारी १७ मार्च रोजी गोंदिया जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये भेट देवून गावकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध, सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा जमी. तर सालेकसा तालुक्यातील भजेपार आणि गोंदिया तालुक्यातील गंगाझरी या गावांचा समावेश असून या गावांमध्ये पोहचून तेथील उपक्रमांची ते पाहणीदेखील करणार आहेत.
 
 
k
  
संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना सुमारे सहा कोटी रुपयांपर्यंत पुरस्कार मिळविता येवू शकतील. दरम्यान अभियानात नागरीकांचा सहभाग वाढावा, जनजागृती व्हावी, यासाठी विविध उपक्रमासह ‘सेलिब्रेटी’ भेट कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. सिने अभिनेता संदीप पाठक यांच्या ग्रामपंचायत भेटीच्या निमीत्ताने सिरेगावबांध येथे अर्जूनी मोरगाव व सडक अर्जुनी तर भजेपार येथे सालेकसा, आमगाव व देवरी त्याचबरोबर गंगाझरी येथे गोंदिया, तिरोडा आणि गोरेगाव पंचायत समितीतील ग्रामपंचायतींच्या सरपंचांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेत संदीप पाठक हे सरपंचांशी संवाद साधून मार्गदर्शन करणर आहेत. दरम्यान ते गावात राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमाच्या स्थळाला भेटी देवून पाहणी करतील. सेलिब्रेटी भेटीच्या अनुषंगाने गावात आरोग्य शिबीर, कर आकारणी शिबीर, वृक्षारोपण, लोकवर्गणी शिबीर असे विविध उपक्रमाच्या आयोजनाचे निर्देश देण्यात आले आहे. तेव्हा संबंधित तालुक्यातील नागरीकांनी या भ्ेटीदरम्यान उपस्थीत राहावे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मधुकर वासनिक यांनी केले आहे.