ग्राहकांनी सजग राहून व्यवहार करावेत : तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
रिसोड,
Consumer awareness, ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही याकरिता सजग राहून आपले दैनंदिन व्यवहार करावेत, असे प्रतिपादन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले.त्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
 
 

Consumer awareness,
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत रिसोड तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष जयंत वसमतकर, तालुका सचिव विजय देशमुख, जिल्हा कार्यकारणी सदस्य माजी मुख्याध्यापक गजानन बानोरे, मोहन देशमुख, संजय उकळकर, विज वितरण कंपनीचे राऊत, पुरवठा अधिकारी गणेश तांगडे,पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष मंगेश सरनाईक, पोलिस उपनिरीक्षक वसंत तहकीक, एसटी महामंडळाचे कालापाड व्यासपीठावर उपस्थित होते. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनानंतर तहसील कार्यालयातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना तहसीलदार Consumer awareness प्रतीक्षा तेजनकर म्हणाल्या की ग्राहकांनी आपल्या हक्कासोबतच आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी.कोणतीही वस्तू खरेदी करत असताना त्याचे पक्के बिल घ्यावे, त्यामुळे आपली फसवणूक झाल्यास आपल्याला रीतसर तक्रार करता येईल. ऑनलाइन खरेदी करताना पुरेशी काळजी घ्या. रिसोड शहर व तालुयामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा नाही. ग्राहकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष जयंत वसमतकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या बँके संबंधित तक्रारी, वजन काटे, इलेट्रॉनिस काटे संबंधी ग्राहकांच्या तक्रारी, पेट्रोल पंपाच्या तक्रारी, वीज वितरण कंपनीचे तक्रारी, ग्राहकांच्या घरकुल संबंधित तक्रारी चे तहसीलदार तेजनकर यांनी निराकरण करावे अशी मागणी केली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील,संजय उकळकर,वीज वितरण कंपनीचे राऊत यांची भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हवगीराव गंगनर यांनी संचलन सादिक शेख यांनी तर आभार प्रदर्शन चेतन जाधव यांनी केले. कार्यक्रमाला विविध शासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सदस्य, स्वस्त धान्य दुकानदार, तहसील कार्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.f