घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍यांवर कारवाई

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
कारंजा लाड,
Domestic gas cylinder misuse घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधरित्या व्यावसायिक वापर करणार्‍यांवर स्थानिक तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने १५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास अचानक धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये कारंजा बायपास परिसरातील व मंगरूळनाथ रोडवरील एकूण २६ प्रतिष्ठान वर तपासणी करण्यात आली. या कारवाईत संबंधितांकडून तीन सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे घरगुती सिलेंडरचा गैरवापर करणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
 

Domestic gas cylinder misuse 
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात अनेक व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याची तक्रार पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा विभाग वाशीम यांच्या आदेशावरून तहसीलदार रवी महाले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पुरवठा विभागाच्या पथकाने १५ मार्च रोजी बायपास परिसरातील अंदाजे २५ ते ३० हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय, कॅफे येथे अचानक छापेमारी करत तपासणी मोहीम राबवली. तपासणीदरम्यान हॉटेल चहा, हॉटेल अखंड अमृततुल्य, हॉटेल कुटुंब येथे १४ किलो वजनाच्या घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचे उघड झाले.
कारवाईदरम्यान संबंधित Domestic gas cylinder misuse आस्थापनांकडील सिलिंडर जप्त करण्यात आले असून, त्याबाबत पंचनामा करण्यात आला आहे. तसेच संबंधितांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले असून, आवश्यक त्या कायदेशीर तरतुदीनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच तपासणीत अनेकांकडे व्यावसायिक सिलेंडर असल्याचे आढळून आले. या कारवाईत निरीक्षण अधिकारी स्मिता नायगावकर, मंडळ अधिकारी महेश धानोरकर, ग्राम महसूल अधिकारी अर्चना चिकटे व राहुल वरघट आणि पुरवठा विभागाचे संगणक परिचालक सागर राऊत व तुषार श्रीरामे सहभागी झाले होते.