विजय माहुरे
सेलू,
Farmers love for Marathi नवीन वर्ष म्हटले की ३१ डिसेंबरची रात्र आणि १ जानेवारी असेच डोयात येते. फारच कोणी मराठी नववर्षाचा आग्रह केला तर तुम्ही इंग्रजी महिन्यांवरच अवलंबून असता ना? असा उलट प्रश्न विचारून पुढच्याची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, शेती आणि शेतकरी हे परस्पर पुरक दोघेही मराठी मासांवर अवलंबून आहे. शेतकर्यांचे नवे वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते. नवीन वर्ष तरी सुखाचे जावो अशी आशा व आकांक्षा घेऊन सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शेतकरी राजा सज्ज झाला आहे.
सततची नापिकी, अतिवृष्टी, अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आपला उदरनिर्वाह करणारा शेतकरी अनेक संकटाना तोंड देत आहे. कर्जाची परतफेड करून घरखर्च या वाढत्या महागाईमध्ये कसा चालवावा या विवंचनेत सतत राहणारा शेतकरी नवी उमंग नवी आशा घेऊन पुन्हा एकदा मराठी नव वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. Farmers love for Marathi शेतात या दिवशी असणार्या मांडवाला, घराच्या दाराला सकाळी आम्रवृक्षाच्या पानाचे तोरण बांधून घरासमोर गुढी उभारून सालाकर्यांचा हिशोब चुकता करण्यात येतो.
सायंकाळी शेतात ‘नवा गडी नवा राज’ सुरू होते. यावेळी कुटुंब व मित्र मंडळी एकत्रित येऊन दाळ पानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. Farmers love for Marathi पण, सततच्या नापिकी मुळे बँकेच्या कर्जाचा वाढलेला डोंगर यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. शेती आहे म्हणून शेती कसायची हा उद्देश महत्त्वाचा आहे. वर्षाचे ६ हजार शासन देत असेलही पण मुलांचे शिक्षण, आरोग्य, महागडे वीज बिल, सिलेंडरचा खर्च, दिवाळी- दसरा सणाचा खर्च भागवायचा कसा असा प्रश्न उभा असतानाच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत शेतकर्यांमध्ये आहे. शेती हा व्यवसाय तोट्याचा असल्याचे पाहून शेतकरी परिवारातील तरुण या शेतीकडे वळत नसल्याचे भयावह चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
खरी अडचण सालगडी
शेती कामासाठी सालगडी मिळत नसल्याने शेतकर्या समोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. काही वर्षापूर्वी ६ कुडव धान्य व रक्कम असे एका वर्षाची मजुरी असत. Farmers love for Marathi आता धान्य देणे बंद झाले तर फत वर्षाची मजुरी रकमेत रूपांतर झाली. पण, आता तर सालगडी मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली. सालगड्याच्या शोधात शेतकर्यांची भटकंती सुरू आहे. शेतीत सालगडी, हंगामी कामाला मजूर आणि पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळेना, असा नन्नाचा पाढा शेतकर्यांच्या आजूबाजुला घुटमळतो आहे. बहुतांश शेतकरी आपली शेती ठेयाने देत आहेत. पण, यावर्षीच्या नापिकी मुळे ठेयाने शेती करण्याससाठीही कुणी पुढे येत असल्याचे चित्र आहे.