देश, भाषा, जात, पंथ याच तत्त्वाचे नाव हिंदू : नेटके

गिरड येथे विशाल हिंदू संमेलन

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
समुद्रपूर,
Huge Hindu gathering ठराविक जात धर्म पंत म्हणजे हिंदू धर्म नाही तर भारत माता की जय वंदे मातरम् देशात भाषा जात पंत याच तत्त्वाचे नाव हिंदू आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध वते अरुण नेटके यांनी केले. स्थानिक श्रीराम मंदिर देवस्थान न्याय (तपोगिरी) येथे आयोजित विशाल हिंदू संमेलनात ते प्रमुख वते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कविता येनुरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून रवि गाठे, नंदनी टिपले, पुनम टिपले उपस्थित होते.
 

wardha  
 
नेटके पुढे म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने हे हिंदू संमेलनं देशात घेण्यात येत आहेत. सर्व धर्मातल्या लोकांनी एकत्रित येणे काळाजी गरज हे साधुसंतांची खरी शिकवण आहे. Huge Hindu gathering हिंदू जागृती मशाल पुन्हा तेजाने प्रज्वलित करण्यासाठी सनातन संस्कृती, धर्म आणि हिंदू ऐकतेचा जयघोष करावाच लागेल असे ते म्हणाले. कविता येनुरकर यांनीही मार्गदर्शन केले. संचालन विष्णू ब्राह्मणवाडे यांनी केले तर प्रास्ताविक रवि गाठे यांनी केले.
 
 
सकाळी १० वाजता गावात परीसरातील भंजनी मंडळीच्या उपस्थित हिंदू जनजागृती मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा समारोप श्रीराम मंदिरात महाआरती करून करण्यात आला. Huge Hindu gathering संमेलन यशस्वी करण्यासाठी रवि गाठे, नुतन गिरडे, अरुण मोटघरे, मोहन गिरडे, राजु नौकरकर, विलास नवघरे, राहुल गाढवे, प्रशांत ठाकूर, बहादूरसिंग अकाली, नरेंद्र मिश्रा, दिलीप खाटिक, संदीप शिवणकर, विठ्ठल चाफले, अनिल गुंडे, संदीप शिवणकर, जगदीश गिरडे आदींसह गावकर्‍यांनी सहकार्य केले.