गोविंदराव वंजारी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
नागपूर ,
Govindrao Vanjari College आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्षा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या डॉ. स्मिता वंजारी यांना त्यांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल आणि समाजाप्रती असलेल्या समर्पणाबद्दल ‘आधुनिक सावित्री पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. स्मिता वंजारी यांनी महिलांच्या विविध क्षेत्रांतील योगदानावर प्रकाश टाकत जीवनातील प्रत्येक परिस्थितीत महिलांनी धैर्याने व आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले.
 
Govindrao Vanjari College
 
कार्यक्रमात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व कलाकार शैल जैमिनी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आणि सामाजिक सुधारणांवर आधारित प्रभावी एकांकिका सादर केली. या सादरीकरणातून महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. Govindrao Vanjari College यावेळी प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांनी समाज घडविण्यात महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
 
महिला कक्षाच्या प्रमुख प्रा. जयश्री महेंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरी निमजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रणाली वानखेडे यांनी केले. Govindrao Vanjari College या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, सचिव व आमदार अ‍ॅड. अभिजित वंजारी, कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी तसेच प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांचा सतत पाठिंबा व प्रोत्साहन लाभले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. त्यामुळे हा कार्यक्रम प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.
सौजन्य: मनोज वैराळकर, संपर्क मित्र